पुणे शहर

सुप्रिया सुळे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल कोथरूड युवक राष्ट्रवादीची कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

पुणे: पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीष गुरनानी यांनी शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना भिकारचोट अशी गलिच्छ भाशा वापरून मा सुप्रिया ताई सुळे यांचा अपमान केला आहे.अशी गलिच्छ भाषा वापरल्यामुळे नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व तेढ निर्माण करण्याचे काम कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले आहे असे गुरनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून व्हिडिओ ची क्लिप पोलिस निरीक्षक बडे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली आहे.कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी मा. पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब व बाळासाहेब बडे  यांच्या कडे दिले आहे.

Img 20221107 wa00231753521829434315593

कोथरूड राष्ट्रवादी युवक वतीने संघटक सचिव केदार कुलकर्णी आणि उपाध्यक्ष सुनील हरळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले या वेळी कोथरूड राष्ट्रवादी युवकचे अनेख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थिती होते.

Img 20221107 wa00246242446261228342920
Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये