पुणे शहर

ई-बाईक योजनेच्या नावाखाली खाजगी कंपनीचे हीत साधणारी प्रक्रिया स्थगित करा : दिपाली धुमाळ

पुणे : स्मार्ट सिटीकडुन मोठा गाजावाजा करीत सुरू केलेली सायकल योजना बंद पडलेली असताना पुणे महानगरपालिकेकडून आता ‘ई-बाईक’ योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. शहराच्या विविध भागात या ई-बाईक उपलब्ध करून देत नागरिकांना प्रवासासाठी नवीन पर्याय उपलब्ध करून देणार असल्याचे भासवुन विशिष्ठ कपन्यांचे हीत साधले जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया स्थगित करण्याची मागणी  महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

Img 20201024 wa0166 1

या संदर्भातील पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.  पुणे शहर हे दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरांमध्ये ३६ लाखांपेक्षा अधिक दुचाकी रस्त्यावर धावतात असा अहवाल पूर्वीच महापालिकेने दिलेला आहे. ‘ई-बाईक’ ही योजना पुणे शहरात राबविणे शक्य असून ते फायदेशीर असल्याचा सकारात्मक अहवाल प्रशासनाने तयार केल्याचे समजते. हा अहवाल कोणत्या आधारावर तयार करण्यात आला याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे .

Img 20201028 wa0145

ही योजना राबवताना चार्जिंग स्टेशनबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.  शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणेसाठी व प्रदूषण विरहित शहर करणेसाठी इलेक्ट्रिक बस हा पर्याय असू शकतो. इलेक्ट्रिक बसेस वाढविणेऐवजी अशा प्रस्तावावर विचार करण्यामागील हेतू संशयास्पद असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

नागरिकांना बसने प्रवास केल्यावरच शहरातील ट्रॅफिक कमी होणार आहे. ‘ई-बाईक’ सारख्या योजना आणून शहराती ट्रॅफिकमध्ये भरच पडणार आहे. पीएमएपीएमएलच्या बसेससाठी चार्जिंग स्टेशन वाढवून इलेक्ट्रिक बसेस वाढविणेसाठी प्रशासनाने प्रयत्‍न करणे गरजेचे आहे पण तसे होताना दिसत नाही.  यापूर्वी शहरात सायकल योजनेचा प्रयोग करण्यात आला असून  ही योजना नियोजनाअभावी फोल ठरली होती. शहरात आता इलेक्ट्रिक चारचाकी व दुचाकी वाहनांची संख्या वाढत असून यासाठी चार्जिंग स्टेशन नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ई बाईक या योजनेतून मनपाच्या जागेत चार्जिंग स्टेशन करणार का अन्य ठिकाणी करणार याबाबत खुलासा करणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व प्रदूषण विरहित करणेसाठी शहराच्या हिताचे निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये