पुणे शहर

पुणे महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी प्रसन्न जगताप

पुणे :  पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी प्रसन्न जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

या निवड प्रक्रियेप्रसंगी भाजपा पुणे शहराध्यक्ष  जगदीशजी मुळीक,  महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष  हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी गटनेते श्रीनाथ भिमाले तसेच शहर सुधारणा समितीचे सर्व सदस्य व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

प्रसन्न जगताप म्हणाले, माझ्यावर विश्वास दाखवून आज मला हे जबाबदारीचे पद दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील,  खासदार गिरीश बापट व इतरही सर्व नेते मंडळींचे मनःपूर्वक आभार मानतो व धन्यवाद देतो. माझ्यावर ही जी जबाबदारी टाकली आहे तिला मी कायम पात्र राहील. तसेच येथून पुढील काळात पुणे शहरातील विकासकामांवर भर  देईल अशी मी सर्वांना ग्वाही देतो.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये