पुणे शहर

वारजेत माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रस्त्यावर खडी पसरल्याने अपघात ; दोन दिवसात डांबरीकरण करा : बाबा धुमाळ

आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत करण्यात आली पाहणी

वारजे : वारजे येथे महामार्गा लगतच्या माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये हायवे ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने अनावश्यक टाकलेली डस्ट व खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी वाहने घसरून अपघात घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी तातडीने योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केली आहे.

माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रस्त्याची माजी नगरसेवक बाबा धुमाळ, हायवे परिसरातील नागरिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कदम, तोडकरी व कोळी यांनी आज पाहणी केली.

माई मंगेशकर हॉस्पिटल समोरील सर्व्हिस रस्त्यावर गेले २-३ दिवसांपासून खड्यांमध्ये संबंधित हायवेच्या ठेकेदाराने अनावश्यक डस्ट संपूर्ण रस्त्यावर टाकल्याने काही दुचाकीस्वारांचे गाडी घसरून अपघात घडले आहेत, त्यातील काही जणांवर सध्या माई मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे अजून किती अपघात होण्याची वाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पाहणार आहे असा सवाल धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.

Fb img 1647413711531 1

नागरिकांच्या सुरक्षेसाठी आज अधिकाऱ्यांना घेऊन रस्त्याची पाहणी केली असता अजच्या आज सदर रस्त्यावरील डस्ट काढून घेण्यात यावी व त्वरित या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

Img 20221012 192956 045 1

वारंवार या रस्त्यावर पडणारे खड्डे व अपघात टाळण्यासाठी व्हायोला चौक ते बाएफ संस्था या दरम्यानचा रस्ता काँक्रिटचा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी यावेळी प्राधिकरणाकडे करण्यात आली. तोपर्यंत व्हायोला चौक ते बाएफ संस्था दरम्यानचा रस्ता दोन दिवसात डांबरीकरण करण्यात यावा. या ठिकाणी पुढील दिवसात दुर्दैवाने जर कोणता अपघात झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व ठेकेदाराची असेल असे सांगण्यात आले. प्रसंगी निवृत्ती येनपुरे, महादेव गायकवाड, अरुण पाटील, राजेंद्र ढोबळे, भगवान गुंड, नाईक काका व वारजे वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये