पुणे शहर

विरेश शितोळे आयोजित किल्ले_स्पर्धा २०२० चा बक्षीस वितरण संपन्न : ATTITUDE रॉकर्स अकॅडमीचा प्रथम क्रमांक

कर्वेनगर : pune city, karvenagar कोरोनाच्या निर्बंधांमुळे लांबलेला विरेश शितोळे मित्र परिवार आयोजित भव्य किल्ले स्पर्धा २०२० चा बक्षीस वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. २०२० दिवाळी किल्ले स्पर्धेचा तपोधाम मधील  ATTITUDE रॉकर्स डान्स अकॅडमीने प्रथम क्रमांक पटकावला.

कर्वेनगर, वारजे परिसरातील शिक्षकांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आला. अतिशय उत्साहाच्या वातावरणात हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यावेळी  किल्ला स्पर्धेत भाग घेणाऱ्या शंकर पांडे काकांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आदरणीय कोकाटे सर, जाधव सर, चौघुले सर, साई जोशी, आबा ठिगळे, कुळकर्णी काका, राहुल जाधव व विरेश शितोळे मित्र परिवार उपस्थित होता.

Img 20211028 wa0192 1

या स्पर्धेत तपोधाम मधील ATTITUDE रॉकर्स डान्स अकॅडमीने प्रथम, होम कॉलनी मधील आरोही मनोहर कदम यांनी द्वितीय तर आकाशनगर मधील आदित्य विठ्ठल मालवाड यांना तृतीय क्रमांक मिळाला.  मागील वर्षी दिवाळी मध्ये विरेश शितोळे यांच्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा घेण्यात आली होती. यात मुलांनी उत्साहात सहभाग नोंदवला होता. मात्र दिवाळीनंतर कोरोनाचे निर्बंध वाढवण्यात आल्याने या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लांबला होता, तो आता संपन्न झाला आहे. यावर्षी ही किल्ले स्पर्धा घेण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

Screenshot 2021 10 26 15 21 45 02
Img 20211101 wa0232
Img 20211102 wa0362
Img 20211028 wa0242
Img 20211028 wa0118
Img 20211029 wa0160
Img 20211028 wa0117
Img 20211027 wa0185
Img 20211027 wa0183
Img 20211102 wa0361
Img 20211102 wa0370
Img 20211102 wa0037
Img 20211102 wa0015
Img 20211027 wa0188
Img 20211029 wa0063
Img 20211102 wa0371
Img 20211028 wa0241
Img 20211101 wa0255

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये