पुणे शहर

हाथरस घटनेचा ‘महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाच्या’ वतीने निषेध

पुणे : महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ व श्रमिक महिला मोर्चाच्या वतीने देशपातळीवर उत्तर प्रदेश मधील हाथरस  येथील घटनेचा निषेध करण्यात आला. या घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करत पुणे येथील श्रमिक भवन कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.

सदर घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडित महिलेला योग्य न्याय मिळायलाच पाहिजे तसेच तिच्या कुटुंबातील सदस्यांना संरक्षण द्या, आरोपींच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून तातडीने निकाल लावा व आरोपीला कठोर शिक्षा द्या अशी मागणी करत  निदर्शने करण्यात आली.

सदर घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. याचाच भाग म्हणून पुण्यात देखील प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचे गांभीर्य केंद्र व उत्तर प्रदेश सरकारने घ्यावी. तसेच महिलांवर वारंवार होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.   

निदर्शनात चंद्रकांत गमरे, मधुकर नरसिंगे, दिलीप कांबळे, निलेश चव्हाण, जयश्री भिसे, मीना खवळे, शोभा बनसोडे, वैशाली बारये, तानाजी रिकीबे, धनंजय आयवळे,  संतोष चव्हाण, पद्मजा माचिकर,  रामदास पवार, नितीन ससाणे, आकाश चव्हाण,  अशोक खानविलकर,  सिद्धार्थ प्रभुणे यांनी सहभाग घेतला होता.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये