पुणे शहर

पुण्यातील सिमेंटच्या रस्त्यांना तडे

पुणे : शहरातील प्रमुख रस्ते सिमेंटचे करून जवळपास १५ वर्ष उलटून गेली आहेत, पण या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिका ढुंकूनही पाहत नाही. एकीकडे डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविताना महापालिकेच्या नाकीनऊ आलेले असताना दुसरीकडे सिमेंट रस्त्याच्या ब्लॉकमध्ये पडलेल्या भेगा, पेव्हींग ब्लॉक व रस्ता समपातळीमध्ये नसल्याने दुचाकी घसरून पडत आहेत. पावसाळ्यात या भेगांचा भयंकर त्रास दुचाकीस्वारांना सहन करावा लागत आहे.

महापालिकेने सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन केले असले तरी त्यासाठी अजून किमान दोन महिने वाट पाहावी लागेल. डांबरी रस्त्यांना पडणारे खड्डे व दरवर्षी त्यावर देखभाल दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे पुणे महापालिकेने शहरातील प्रमुख मोठे रस्ते सिमेंटचे करण्याचा निर्णय घेतला. सिमेंटचा रस्ता केल्याने ते पावसाळ्यात खराब होत नाहीत, खड्डे पडत नाहीत पण हे रस्ते आता दुचाकीस्वारांसाठी धोकादायक झाले आहेत. बाणेर-बालेवाडी, औध रस्ता, सिंहगड रोड, पौंड रस्त्याबाबत वाहनचालकांच्या प्रामुख्याने तक्रारी आहेत.

Img 20220518 wa00135092505186750304354 2


सिमेंट रस्त्यांच्या जॉइंटमध्ये पडलेल्या भेगा आणि रस्त्यांना तडे गेल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पथ विभागाकडून पूर्व व पश्चिम विभागासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांची निविदा काढली जाणार आहे. शहरातील प्रमुख १५ रस्त्यांवर लवकरच काम सुरू केले जाईल.

Img 20220610 wa0330
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये