दहावीच्या अभ्यासासोबत मानसिक, शारिरीक दृष्ट्या सक्षमतेचे गणित जमले पाहिजे. – डॉ. अ. ल. देशमुख

महर्षी कर्वे शिक्षण संस्थेमध्ये “ओळख दहावीची” कार्यक्रमात डॉ. अ. ल. देशमुख यांनी साधला मुलींशी सवांद…
पुणे : विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासाची तयारी करताना आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी अभ्यासातील गणितासोबत योग आणि व्यायाम करून शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम होण्याचे गणितही जमले पाहिजे. असे मत शिक्षण तज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी व्यक्त केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावाढदिवसानिमित्त भाजप ओबीसी आघाडी सरचिटणीस विनोद मोहिते यांनी कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत “ओळख दहावीची” हा मार्गदर्शन कार्यक्रम सलग पाचव्या वर्षी आयोजित केला होता. डॉ अ. ल.देशमुख बोलत होते. यावेळी “इयत्ता दहावी अभ्यासाचा कानमंत्र” या पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. अ.ल.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

देशमुख यांनी कार्यक्रमा मध्ये शरीरा सोबतच मानसिक स्थिती कशी स्थिर ठेवाता येईल या बद्दल मुलींशी संवाद साधला या कार्यक्रमात मुलींची संवाद साधून त्यांना प्रोसाहित केले.
त्यांनी मुलींना गुण कसे वाढवायचे, अभ्यासाचे कसे नियोजन करायचे तसेच व्यायामाविषयीचे महत्व सांगितले. त्यांनी सांगितले कि फक्त अभ्यासच नाही तर व्यायाम देखील तितकाच महत्त्वाचा आहे , आपली मानसिक स्थिती देखील उत्तम राहिली पाहिजे.
यावेळी डॉ. अ. ल. देशमुख यांनी अभ्यास कसा करावा तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी त्यांनी मुलींना माहिती दिली. श्रीराम लेकुरवाळे यांनी गणित विषयावर, डॉ. श्रुती चौधरी यांनी इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले. व्याख्याना दरम्यान त्यांनी पुस्तकाचे वाटप केले. व्याख्यान संपल्यानंतर मुलींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.



विनोद मोहिते म्हणाले, इयत्ता दहावी अभ्यासाचा कानमंत्र या पुस्तकेमध्ये इयत्ता दहावीच्या पुर्ण वर्षाचे अभ्यासाचे, खेळाचे व इतर गोष्टींचे नियोजनाची माहिती देण्यात आली आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नक्कीच मोठा फायदा होणार आहे.
यावेळी माजी नगरसेवक सुशील मेंगडे, हेमंत बोरकर, सतीश झंझाड, अनंत शिंदे, जितेंद्र गाडे, गणेश पासलकर, मुख्याध्यापिका शोभा कांबळे, अनिल शिंदे, दत्ता माने, सुनिल चौगुले, विजय विटेकर, बालाजी पवार, लालू मोहिते, केवल चव्हाण, विजय दौंडकर, कैलास देवकर,रमेश चौधरी, नितिन मोहिते, विशाल पिसाळ, गणेश नागोठणेकर उपस्थित होते.









