चांदणी चौकातील कलासागर सोसायटीचा रस्त्याचा प्रश्न सुटला

किरण दगडे पाटील यांच्या पाठपुराव्यातून व आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काम मार्गी..
कोथरूड : चांदणी चौकातील पाण्याच्या टाकी मागे असणाऱ्या कलासागर सोसायटीचा गेली अनेक वर्ष रखडलेला रस्त्याचा प्रश्न पावसाआधी सुटल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आमदार भीमराव तापकीर यांच्या विकास निधीतून व नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या पाठपुराव्यातून या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे.
चांदणी चौकातील पाण्याच्या टाकी मागे कलानगर सोसायटी हा रहीवाशी भाग आहे पण या भागात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषकरून पावसाळ्यात या रस्त्याने जाताना कसरत करतच नागरिकांना घरापर्यंत जावे लागत होते. त्यामुळे या रस्त्याचे काम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. या रस्त्याचे काम करून देण्यात येईल असा शब्द नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी या भागातील नागरिकांना दिला होता.

किरण दगडे पाटील म्हणाले, मी पाठपुरावा करून स्थानिक आमदार भीमराव तापकीर यांच्या विकास निधीतून या रस्त्याचा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याने जाताना होणाऱ्या त्रासातून येथील नागरिकांची सुटका झाली आहे.
किरण दगडे पाटील यांनी रस्ता करून देण्याबाबत दिलेला शब्द पाळल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






