पुणे शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अखेर रद्द

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 28 जानेवारीचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. देशभरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून दौरा रद्द झाल्याची माहिती पुणे जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आल्याची माहिती आहे.

वाढत्या कोरोना संसर्गामुळं पुणे दौरा रद्द, सूत्रांची माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. पुण्यात त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची पुणे जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात येत होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये देशात आणि महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Img 20220108 wa0160

नरेंद्र मोदी पुणे यांच्या उपस्थितीत पुणे मेट्रो उद्घाटन, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाच कलादालन, पुणे महापापालिकेतील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार होतं. तसेच नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, नरेंद्र मोदींचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पुण्यातील विविध विकासकामांची उद्घाटन करण्यात आली होती. भाजपनं अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं होतं.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm
Img 20220108 wa0171

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये