महाराष्ट्र
शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार

पुणे : पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणार्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार करण्याचा प्रकार वानवडीत समोर आला आहे. मुख्य रस्त्यावर येऊन अतिक नामक युवकाने हातात पिस्तुल घेऊन ‘यहाँ के भाई हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे’, असं म्हणत पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. संबंधित युवकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेत चार ते पाच आरोपींचा समावेश आहे. आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र पुण्यात कोयता गँगच्या धुडगूसीनंतर आता भर चौकातील फायरिंगसारखा प्रकार समोर आला आहे.




