अजित पवार म्हणजे राजकारणातील परखड माणूस : चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकारणातील परखड माणूस अशा शब्दात गौरव करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना पाटील यांनी म्हंटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून काम करताना सामान्य माणसाला सूख देण्यासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना आगामी काळातही महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी.

महाराष्ट्रातील या दोन नेत्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले होते यावर नेत्यांच्या वाढदिवसाला बेकायदा होर्डिंग्ज लावून नेत्यांना अडचणीत आणू नका आणि आचारसंहिता पाळा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. बेकायदेशीर होर्डिंग्ज लावणाऱ्या कार्यकर्त्यांवरील कारवाईचे त्यांनी समर्थन केले.
यावेळी बोलताना कोरोनाच्या भीतीमुळे अनिश्चित काळासाठी समाज बंद करून ठेवणार का ? असा सवाल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे.






























