पुणे शहर

पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

पुणे : पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे .रेल्वे स्थानकात श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली, मात्र तिथे काहीही आढळून आले नाही. या धमकीच्या फोनमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली आहे.

पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्थानकावर धाव घेऊन एक्सप्रेस थांबवल्या आणि बॉम्बचा शोध घेण्यास सुरू केली.

श्वान पथकाच्या माध्यमातून बॉम्बचा शोध घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. प्रवाशांनीही जीव मुठीत घेऊन स्थानकातून पळ काढला. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास त्याची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये