कोथरुड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोथरूडमध्ये उधळला खंडोबाचा भंडारा..

कोथरुड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पौड रस्त्यावरील श्री. साई मित्र मंडळाला सदिच्छा भेट देत मंडळाने साकारलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरात खंडेरायाची तळी उचलून भंडारा उधळला व मंडळाच्या गणरायाची आरती केली.

यावेळी मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, युवा सेना सचिव किरण साळी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं ढोलताशांच्या गजरात आणि फुलांची उथळण करत जंगी स्वागत करण्यात आलं. मंडळाचं निमंत्रण स्विकारुन मंडळाला भेट दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मंडळाचे संस्थापक मुरलीधर मोहोळ यांनी आभार व्यक्त केले.

साई मित्र मंडळाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने या ठिकाणी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी शिंदे यांनी मंडळाने हुबेहूब उभा केलेल्या जेजुरी मंदिराचे कौतुक केले. या आगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मंडळाला सदिच्छा भेट दिली आहे. जेजुरीतील खंडोबाचे हे मंदिर पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होत आहे.

Fb img 1647413711531

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये