कोथरुड

कोथरूडमधील माय विंग शोरुमकडून नियमांचे उल्लंघन ; महापालिका व पोलिसांची दंडात्मक कारवाई..

कोथरुड : कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळून खासगी आस्थापना, दुकाने, मॉल, शोरुम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.  तरीही कोथरुड मधील भुसारी कॉलनीतील माय विंग हे दुचाकी वाहनाचे शोरुम सुरू ठेवण्यात आल्याने त्यांच्यावर महापालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय व कोथरुड पोलीस स्टेशनच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. Violation of rules from My Wing showroom in Kothrud;  Punitive action of Municipal Corporation and Police ..

शासनाच्या नियमानुसार बंदी असतानाही हे शोरुम सुरू असून त्याठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी काम करत असल्याची बाब भाजप युवा मोर्चा चे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी कोथरुड पोलीस स्टेशन व कोथरुड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या निदर्शनास आणून  दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

IMG 20210223 WA0156

यासंदर्भात कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोवीड  नियमांचे उल्लंघन करून अत्यावश्यक सेवा वगळून दुकाने आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना माय विंगमध्ये ५० कर्मचारी कामाला उपस्थित होते त्यामुळे माय विंग शूरुमच्या व्यवस्थापनाला २५००० रुपये दंड करण्यात आला आहे.

कोथरुड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल माय विंग मधील २५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड कोथरूड पोलीस स्टेशनकडून करण्यात आला आहे.

दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले की सरकारने कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. व्यापारी व नागरिकांकडून या नियमांचे पालन केले जात आहे. असे असताना माय विंग शोरुम चालकाने अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही नियम मोडत शोरुम चालू ठेवले व मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामाला बोलावले होते. अशा घटनांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ही बाब महापालिका व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये
Close
Close