पुणे शहर

कामगार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र वाघ यांचा सन्मान.

पुणे : punecity कामगार भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र वाघ व सौ. रंजना राजेंद्र वाघ या दांपत्याचा ज्येष्ठ साहित्यिक विजय शेंडगे आणि ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या हस्ते रुक्मिणीची मूर्ती देऊन काव्यानंद साहित्य कला प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली काव्यमैफल चांगलीच रंगली. या मैफिलीत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळकृष्ण नेहरकर, कवी देवा झिंजाड, अनिल बोरोले, सोहोनी डांगे, धनंजय तडवळकर, विजय शेंडगे, विद्या अटक, राजेंद्र वाघ, दिनेश शिर्के इत्यादी कवींनी सहभाग घेत आपल्या काव्य रचना सादर केल्या.

याप्रसंगी भावेश हॉटेलचे प्रेमराज वाघमारे,सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशकर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण नेहरकर यांनी केले तर कवी देवा झिंजाड यांनी आभार मानले.

Img 20220611 wa00023929857787733205553
Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये