महाराष्ट्र

राष्ट्र सेवा दलाचा सलोखा सप्ताह

पुणे : राजकीय पक्षांकडून समाजात दुही निर्माण करण्याचे राजकारण सुरू असतानाच राष्ट्र सेवा दलाने मात्र 3 मे ते 10 मे 2022 या कालावधीत राज्यात सलोखा सप्ताह (amicability week) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खूले करावे यासाठी साने गुरुजींनी 1 मे ते 10 मे 1947 या कालावधीत उपोषण केले होते त्याचे औचित्य साधून हा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे राष्ट्र सेवा दलाने म्हटलं आहे.

या सप्ताहातंर्गत प्रत्येक गावात, शहरात आणि संविधान चौकात “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना म्हणण्यात येणार आहे. यात विविध संस्था, तरुण मंडळं, विविध राजकीय पक्षांचे स्थापन नेते, पोलीस आदींना सहभागी करून घेण्यात येणार आहे. संत तुकाराम, संत शेख महमद, संत ज्ञानेश्वर माऊली, कबीर, नामदेव, जनाबाई यांचे एकतेचे, समतेचे अभंग गायले जाणार आहेत. वारकऱ्यांचा आणि गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची परंपरा पुढे नेणारी भजनी मंडळं, कीर्तनकार, प्रवचनकार यांचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. कोणताही ध्वनीक्षेपक यावेळी लावायचा नाही, असा निर्णयही राष्ट्र सेवा दलाने या सप्ताहाबाबत घेतला आहे.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये