नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी : सेलिब्रिटी व मान्यवर व्यक्तींची उपस्थिती

बावधन : बावधन मधील नगरसेवक किरण दगडे पाटील मित्र परिवार आयोजित दहीहंडी हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील सेलिब्रिटी तसेच प्रमुख राजकीय व्यक्तींच्या व जमलेल्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत जल्लोष पूर्ण वातावरणात फोडण्यात आली. या दहीहंडीने गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक केल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

नगरसेवक किरण दगडे पाटील यांची दहीहंडी तरुण तरुणी व परिसरातील नागरिकांसाठी कायमच आकर्षणाचा कंद्रबिंदू राहिली आहे, त्यामुळे दरवर्षी ही दहीहंडी गर्दीचे रेकॉर्ड ब्रेक करत चालली आहे. बावधन बु. येथील तलाठी कार्यालयाच्या समोरील मैदानात मोठ्या जल्लोषात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर थिरकत, गोविंदा आला रे आला चा जयघोष करत तरुणाईने आनंद साजरा केला.
यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसेच या दहीहंडीच्या उत्सवास द केरला स्टोरी फेम अभिनेत्री अदा शर्मा, प्रसिद्ध अभिनेते देवदत्त नागे, घर बंदूक बिर्याणी फेम अभिनेत्री सायली पाटील यांनी उपस्थित राहून उपस्थितांचा उत्साह वाढविला. पुण्यातील कसब्यातील भोइराज ग्रुप ने दहीहंडी फोडली आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.






किरण दगडे पाटील म्हणाले, पुण्यातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून दहीहंडीचा सर्वत्र नावलौकिक आहे. हे श्रेय दरवर्षी विविध ठिकाणावरून येणाऱ्या सर्व गोविंदा पथकांचे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक गोविंदा पथकांनी मोठ्या आनंदात या दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला आणि ही भव्य दहीहंडी साकार झाली. अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दर्शविल्याबद्दल सहभागी झालेल्या सर्व गोविंदा पथकांचे आणि उपस्थितांचे मनस्वी आभार!








