पुणे शहर

अनधिकृत बांधकामाची नोटीस दिल्याने महापालिका अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

पुणे : पुण्यात वारजे माळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिल्याच्या रागातून महापालिकेच्या अधिकान्याला शिवीगाळ करून जीव मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गणपती शिवणे येथे देशमुखवाडी बस स्टॉप जवळ हा प्रकार घडला. या प्रकरणी गणेश तुकाराम वांजळे यांच्यावर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दत्तात्रय निवृत्ती जगताप (वय ५४, रा. मोहननगर, धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. FIR गणेश तुकाराम वांजळे (रा. न्यू अहिरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगताप पुणे महापालिकेत शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी आरोपीला अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली होती. नोटीस दिल्याचा रागातून आरोपीने जगताप यांचा गणपती माथा ते देशमुखवाडी दरम्यान पाठलाग केला. त्यांना गाठून शिवीगाळ केली. अपंग असल्यावरून त्यांना हिणवले, नोटीस फाडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि अपंगत्वाबद्दल हिणवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलिस करीत आहेत.

Img 20230717 wa0012281291948762095496285435
Img 20230511 wa0002282295271751229740402775
Img 20221228 wa0001282294128958397815578022
Img 20230812 wa0001281297517832967883010071

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये