जॉब्स

Goverment jobs : सरकारी नोकरीसाठी मनसेची मोफत मार्गदर्शन पुस्तिका अशी करा डाऊनलोड

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विजयादशमीला मराठी मुलांना सरकारी नोकरीच्या सोन्यासारख्या संधी देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. मनसेच्या राजगड मुख्यालयात याचा प्रकाशन सोहळा झाला. ही पुस्तिका मराठी मुलांना मोफत डाऊनलोड करता येणार आहे. त्याबाबतची माहिती ‘सिंहासन न्यूज’ आपल्या वाचकांना देत आहे.

स्पर्धा परीक्षेचं नेमकं महत्त्व काय, त्यासाठी अर्ज कसा भरायचा, पूर्वतयारी कशी करायची यासंदर्भात मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मराठी तरुणाईसाठी नोकरीची महासंधी- स्टाफ सिलेक्शन कमिशनची महाभरती ही मार्गदर्शन पुस्तिका बनवली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी या पुस्तिकेची मराठी तरुणांना मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कीर्तिकुमार शिंदे लिखित ही मार्गदर्शक पुस्तिका डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरावा असे आवाहन मनसे नेते अमित ठाकरे यांनी केले आहे. तसेच या स्पर्धा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ठिकठिकाणी मनविसेच्या माध्यमातून मार्गदर्शन शिबिरं आयोजित करण्यात येणार असल्याचेही अमित ठाकरेंनी सांगितले आहे.

Img 20220924 182515 453

मोफत मार्गदर्शन पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी लिंक : https://uploadnow.io/f/3gP2zX2

Fb img 1647413711531

कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन- २०२२ परीक्षेचा अर्ज करण्यासाठी लिंक : https://ssc.nic.in

Img 20220610 wa0330

स्टाफ सिलेक्शन कमिशनने केंद्र सरकारी- प्रशासकीय व्यवस्थेतील २०,००० पदांसाठीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली आहे. कम्बाईन्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन- २०२२ (CGLE 2022) या परीक्षेद्वारे या पदांवर भरती होणार असून त्यासाठी पदवीधरांना अर्ज करता येणार आहे.

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये