कोथरुड
केळेवाडीत शिवसेनेची सभासद नोंदणी

कोथरूड : कोथरूड मतदारसंघातील पौड रोड केळेवाडी चौक प्रभाग क्रमांक ११ या ठिकाणी शिवसेना सभासद नोंदणी अभियान या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे शहर संघटक नितीन पवार यांनी केले होते.
या कार्यक्रमावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे,पुणे महानगरपालिकेचे गट नेते पृथ्वीराज सुतार,महिला शहर संघटीका सविता मते,शाम देशपांडे, योगेश मोकाटे , अंकुश तिडके, शुभम कांबळे ,मंदार धुमाळ, किशोर सोनार, लखन तोंडे, सुनिल पासलकर, सौरभ कुसाळकर, शाकिर शेख, निलेश सोनटक्के, छाया भोसले, कस्तुरी पाटील, सविता बलकवडे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नितीन पवार म्हणाले, नव्याने शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने विवीध विभागांमध्ये सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.




