पुणे शहर

नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी व निसर्गास बाधक बाबी दूर करा :  खासदार मेधा कुलकर्णी.

पुणे : पुण्यात केंद्राच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्याने नदी सुधार प्रकल्प राबवला जात असून 44 किलोमीटरच्या एकूण कामासाठी सुमारे 4700 कोटी रुपये निधी आवश्यक आहे. या कामाचा एकंदरीत DPR झाला असून यात काही त्रुटी आहेत. शिवाय बंडगार्डन येथील कामादरम्यान नदीत भराव टाकून नदीचे पात्र कमी करण्यात आले आहे व 200 वर्षांचे जुनी वृक्षांची कत्तल केली जात आहे. याविषयी केंद्रीय मंत्री, श्री. सी. आर. पाटील यांच्याकडे खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली आहे.

पुण्यातील नदी सुधार योजनेच्या 44 किलोमीटर कामातील एक टप्पा राम-मुळा संगम येथील जागा पाहाणीचे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त, श्री. राजेंद्र भोसले यांच्यासह मनपा अधिकारी, जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

या व्यतिरिक्त ज्या स्ट्रेच मध्ये अद्याप काम चालू नाही व सर्वे करून झाडांवर क्रमांक टाकले आहेत. भराव टाकण्याबाबत DPR तयार होत आहेत अशा स्ट्रेचेस मधील कामे त्वरित थांबवावीत. यासाठी जीवित नदी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. या अनुषंगाने ही जागा पहाणी आयोजित केली गेली होती. राम नदी, मुळा नदी संगम औंध येथे राम नदीवरील भराव टाकणे, मुळा नदीपात्रात 300 ट्रक राडारोडा टाकणे, झाडांवर क्रमांक टाकणे, PCMC हद्दीत भराव टाकण्याचे कंत्राटद्वारामार्फत चालू असलेली काम अशा बाब उघड झाल्या.

“नदीचे पात्र रुंद असून ते अबाधित ठेवावे व झाडे तोडली जाऊ नयेत असा आमचा आग्रह आहे.” असे डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. यासंदर्भात नजीकच्या काळात विभागीय आयुक्त डॉ. महेश पुलकुंडवार यांच्याकडे PMC व PCMC च्या आयुक्तांसह व पर्यावरण स्नेही संस्थांना घेऊन बैठक आयोजित करणार असून तोवर चालू काम थांबवण्यात आल्याचे डॉ. मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात PCMC आयुक्त श्री. शेखर सिंग यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली गेले.

” नदीपात्रात भराव टाकल्याने नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मिती अडथळे व पावसाळ्यात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक रहिवासी संस्थांमध्ये पाणी शिरते व जीवनमान विस्कळीत होते. नदीला नैसर्गिक सुंदरता आवश्यक असून भराव सारख्या अनैसर्गिक गोष्टींची बाधा, वृक्षतोड, पक्षांच्या अधिवासाचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही” असा इशारा डॉ. मेधा कुलकर्णी यांनी दिला.

यावेळी  पुणे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, पर्यावरण विभाग प्रमुख श्री. संजय शिंदे, पर्यावरण अधिकारी श्री. मंगेश दिघे, प्रकल्प विभागचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उप. अभियंता मुकुंद शिंदे, महापालिका परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री. अविनाश संकपाळ, प्रकल्प सल्लागार एचपीसी यांचेकडून अर्चना कोठारी, अरबाज, औंध क्षेत्रीय कार्यालय सहा आयुक्त गिरीश दापकेकर, पुढे शहर सरचिटणीस गणेश कळमकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, पुणे रिव्हर रिव्हावल समूहाकडुन श्रीमती शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, मुकुंद मालवणकर व इतर (जीवीतनदी), रुपेश केसेकर, चैतन्य केट, मेघना भंडारी (पुणे संवाद), ऍड. अमेय जगताप, अस्मिता करंदीकर, उमा गाडगीळ, ऍड पी. डी. तारे (बाणेर बालवाडी नागरिक मंच), वेताळ टेकडी बचाव समिती प्राजक्ता पणशीकर, पुष्कर कुलकर्णी उपस्थित होते.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये