पुणे शहर

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवेंचा राजीनामा; शहराध्यक्षपदावर वर्णीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चुरस

पुणे : काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पाच वर्षाहून अधिक कालावधीसाठी पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदे रिक्त करावीत, असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला होता. त्यानुसार बागवे यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि रोहित टिळक यांनीही राजीनामा दिला आहे. दरम्यान, रमेश बागवे यांनी राजीनामा दिल्याने शहराध्यक्षपदावर वर्णी लागावी, यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या चिंतन शिबिरात एक व्यक्ती एक पद असा ठराव करण्यात आला आहे. रमेश बागवे गेल्या सहा वर्षांपासून शहराध्यक्षपदावर काम करत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांना प्रदेश काँग्रेसकडून मुदतवाढ देण्यात आली होती. काँग्रेसचा शहराध्यक्ष बदलावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सातत्याने केली आहे. शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्यातील पक्षांतर्गत संघर्षही अनेकवेळा पुढे आला आहे. मात्र प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी बागवे यांना मुदतवाढ दिली होती. आता ठरावानुसार बागवे यांनी राजीनामा दिल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपद मिळावे, यासाठी ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात शहराध्यक्षपदाची नियुक्ती प्रांताध्यक्षांच्या आदेशानुसार करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Img 20220518 wa00135092505186750304354 2

पक्षाची संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. ही प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होईल. तोपर्यंत बागवे हेच हंगामी शहराध्यक्ष राहतील, असे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये