राष्ट्रीय

‘महाभारता’तील बलाढय ‘भीमा’ची भूमिका साकारणाऱ्या प्रवीणकुमार सोबती यांचे निधन

मुंबई : ‘महाभारता’तील बलाढय ‘भीमा’ची भूमिका साकारणाऱ्या प्रवीणकुमार सोबती (वय. 74) यांचे निधन झाले आहे.

दुरदर्शनवरील ‘महाभारत’ (Mahabharat) या पौराणिक कथानक असणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. एक काळ गाजवणारी ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय मानली जाते. आजही ही मालिका डाऊनलोड करुन अनेक जण पाहतात. प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) गेल्या काही काळापासून आजारी होते. आजारपणासोबत त्यांना आर्थिक चणचणही भासू लागली होती असं म्हटलं जात होतं  पण, हे सत्य नसल्याचं सोबती यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं आहे. 

Img 20220206 wa00011502175928892672051

गेल्या वर्षी प्रवीण कुमार सोबती (Praveen Kumar Sobti) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या पायांना दुखापत झाल्याचं सांगितलं होते. मुळच्या पंजाब येथील असणाऱ्या प्रवीण सोबती यांनी खेळातही चांगला सहभाग घेतला होता. हॅमर आणि डिस्कस थ्रो, थाळीफेक यामध्ये ते सक्रिय होते. आशियायी आणि कॉमनवेल्थ खेळांमध्ये ते सहभागी झाले होते. इतकंच नव्हे, तर ऑलिम्पिकमध्येही त्यांनी देशाचं प्रतिनिधीत्व केलं होतं.

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये