महाराष्ट्र

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी रोहित पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र ; ही केली मागणी

नागपूर : आज विधिमंडळ अधिवेशनाचा दुसरा दिवस असून आजच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत पुण्यातील विषयाकडे लक्ष वेधले आहे. काल पहिल्या दिवशी रोहित पवार यांनी सत्ताधारी मंत्र्यांना महापुरुषांची माहिती असलेली पुस्तके भेट दिली होती तर आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत एक मागणी केली आहे.

महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असलेल्या भिडेवाड्याची दूरवस्था झाली आहे. स्त्री शिक्षणाचा पाया ज्या वास्तूत रचला तिची दूरवस्था होणं, हे योग्य नाही.

हा विषय मी याआधीही मांडला आहे. या वाड्याचं संवर्धन व विकास करण्यासाठी निधी द्यावा आणि या ठिकाणी पुन्हा मुलींची शाळा सुरु करावी,अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं त्यांनी केली आहे. ते योग्य निर्णय घेतील,अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेले पत्र

प्रति,
मा. ना. श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई – ३२.

विषय :- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तु असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध होणेबाबत.

महोदय,
उपरोक्त विषयान्वये १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडे वाडयात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेंच्या कार्यकर्तुत्वाने शिक्षण घेण्याची संधी महिलांना मिळाली आणि त्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी प्रगती केली आहे. पण स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेला भिडे वाडयाची मात्र दुरावस्था झालेली आहे. बुधवार पेठेतील हा वाडा गेली कित्येक वर्षापासून अखेरचा घटका मोजत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा काढली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. मुली शिकून आपल्या पायावर उभ्या राहिल्या. त्या वास्तुची आजची अवस्था दुर्दैवाने फार खराब आहे. सदर ठिकाणी पुन्हा गरीब मुलींसाठी शाळा सुरू होणेबाबत जनसामान्यातून मागणी होत आहे. तरी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध करून पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्यात यावी, ही विनंती.
ओपला स्नेहांकित,
(रोहित पवार)

Img 20221126 wa02126927299965323449855

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये