शालेय कबड्डी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत १९ वर्ष गटात कलावती बधे ज्यु काॅलेज विजय

पुणे : महाराणा प्रताप संघ पुणे आयोजित पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग व पुणे जिल्हा परिषद क्रिडा युवा संचनालय यांचे संयुक्त विद्यमाने माजी नगरसेवक स्व. दत्ताजीराव पासलकर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या आंतर शालेय कबड्डी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेत १९ वर्षे मुलांच्या गटात ८८ संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ नुकताच पार पडला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण माजी सभागृह नेते धीरज घाटे माजी नगरसेवक दिनेश धाडवे, हरिदास चरवड यांच्या हस्ते पार पडला यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव पुणे जिल्हा कबड्डी असो. कार्यवाह राजेंद्र आंदेकर, पुणे जिल्हा कबड्डी असो. सहकार्यवाह दत्ताञय कळमकर, राष्ट्रीय खेळाडू तानाजी शिंदे, प्रवीण नेवाळे, सुधीर कुरुमकर, संयोजक राजाभाऊ पासलकर, पुणे महापालिका शिक्षण विभागाचे क्रिडा अधिकारी महेश तिमोणे, संजय पासलकर उपस्थित होते.
१९ वर्षे, मुलांचा अंतिम निकाल..
अंतिम सामना कलावती बधे ज्युनियर काॅलेज विरुध्द एच. वी. देसाई काॅलेज असा झाला.
गुण फलक : ३९ वि ८ प्रथम क्रमांकासाठी ३१ गुणांनी मात करत कलावती बधे ज्यु काॅलेज ने विजय मिळवला.
नु.म.वी. ज्युनियर काॅलेज विरुध्द बाल शिक्षण मंदीर इंग्रजी माध्यम विद्यालय यांच्या अटीतटीचा सामना झाला.
गुण फलक : ३४ वि ३३ , १ गुणांनी नु.म.वी.ज्यु. काॅलेज विजयी ,
१४/१७/१९ वर्षे मुला मुलींचे शालेय निवड सामने दि. २/१२/२०२२ ते १५/१२/२०२२ दरम्यान नेहरु स्टेडियम क्रिडांगणावर आयोजित करण्यात आले होते. या सामन्यांसाठी ६७८ संघांनी सहभाग नोंदवला.
