भाजपा सहकार आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी सचिन दशरथ दांगट यांची निवड

पुणे : वारजे येथील भाजपाचे सक्रीय कार्यकर्ते सचिन दशरथ दांगट यांची भाजपा सहकार आघाडी , पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
याप्रसंगी संघटनमंत्री रविजी अनासपुरे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश घोष , नगरसेवक दिपक पोटे , दिपक नागपुरे , प्रवक्ते धनंजय जाधव , विकास लवाटे , दक्षिण भारतीय आघाडीचे राजेश पिल्ले यांचेसह भाजपा शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
गेली ५ वर्षे स्वीकृत सभासद म्हणुन काम करीत असताना २०१७ साली झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र ३२ मधुन पराभवाला सामोरे गेलेले सचिन दशरथ दांगट हे भारतीय जनता पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते आहेत .
पराभवानंतर सातत्याने समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात ते कायम अग्रेसर आहेत . कोरोनाचे काळात सत्तेत नसताना हजारो लोकांना कोरडा शिधा वाटप , औषधे वाटप , ४००० परप्रांतीय नागरिकांना डॅाक्टर फिटनेस सर्टीफिकेट , पोलीस पासेस व्यवस्था अश्या अनेक मदतीचे कार्यक्रम तसेच पक्षाचे दिलेले सर्व कार्यक्रम भाजपाचे वतीने घेतले आहेत .

यापुर्वी पुणे महानगरपालिका प्रभाग क्र ३२ चे भाजपाचे उमेदवार , सरचिटणीस खडकवासला विधानसभा मतदार संघ , स्वीकृत सभासद पुणे मनपा यांचेसह अनेक सामाजिक संस्थाचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे . समाजोपयोगी आणि नाविन्यपुर्ण उपक्रम राबविणारा हाडाचा कार्यकर्ता म्हणुन सचिन दशरथ दांगट यांची ओळख आहे .भारतीय जनता पक्षाने दिलेल्या संधीबद्दल सर्वच नेतेमंडळीचे सचिन दांगट यांनी आभार व्यक्त केले आहेत .






