पुणे शहर

सायली पाटीलचा नृत्याचा आविष्कार आणि ढोल पथकाचा खेळाचा वारजे कर्वेनगरच्या नागरिकांनी लुटला आनंद

प्रमोद शिंदे आयोजित दहीहंडी चाकणच्या गोविंदा पथकाने फोडली..

कर्वेनगर : ढोल पथकाचा निनाद, सायली पाटीलचा नृत्याचा आविष्कार आणि हिंदी मराठी गाण्यावर थिरकत वारजे नाक्यावर झालेल्या दहीहंडीत नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. अखिल कर्वेनगर वारजे दहीहंडी उत्सव, शिवनंदन प्रतिष्ठान, फक्त मित्र प्रतिष्ठान व मॉस्को ग्रुप आयोजित दहीहंडी चाकण मधील महात्मा फुलेनगर गोविंदा पथकाने सहा थर लावत फोडली.

Img 20250817 wa00476868429097645884507

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड मतदार संघाचे माजी युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या वतीने वारजे लाईट हाऊस तिरुपतीनगर येथे या भव्य दहीहंडीचे संयोजन करण्यात आले होते. पुणे शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी या दहीहंडी उत्सवाला भेट देत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

Image editor output image 1038166475 17554028510146523406530268435502

वारजेतील तिरुपतीनगर येथे झालेल्या या दहीहंडीत सायली पाटील हिच्या नृत्याच्या आविष्काराने नागरिकांना मंत्रमुग्ध केले. शिवदुर्ग वाद्य पथकाने ढोल ताशाचा खेळ सादर करत वातावरणात रंगत आणली. गोविंदा रे गोपाळा, बोल बजरंग बली की जय, चांदी की डाल पे अशा गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरत दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला.

या दहीहंडीला भोलानाथच्या भंडाऱ्याची प्रतिकृती असलेली अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. चाकण मधील गोविंदा पथकाने ही दहीहंडी फोडली आणि एकच जल्लोष झाला. उपस्थितांनी मोबाईलच्या टॉर्च लावून गोविंदा पथकाला  मानवंदना दिली.

Img 20250817 wa00435370131050214176661

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने,  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप बालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) विद्यार्थीचे राष्ट्रीय अध्यक्ष सनी मानकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस नितीन जाधव श्रुती पायगुडे  राहुल खंदारे, चेतन भानुसघरे, अमोल सातकर, दिनेश सलगर , वैभव कोठुळे राम सरवदे, लखन लोखंडे, सोन्या रावळे, मोहन देवरे, मॉन्टी मासुळे, अथर्व कदम यांनी या दहीहंडीला उपस्थिती लावली.

शिवनंदन प्रतिष्ठान, फक्त मित्र प्रतिष्ठान व मॉस्को ग्रुपचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Img 20250816 wa0265716548284425373737
Img 20250817 wa00459206929081855808680
Img 20250508 wa00018046597267745442111
Img 20240404 wa0013282295561886146142642027

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये