पुणे शहर

पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरू होणार – महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे: मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पुण्याचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात तीन दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळं पुणे महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

राज्य सरकारकडून पहिली ते चौथीच्या शाळा उद्यापासून सुरु करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शाळा सुरु करण्याबाबत प्रशासनात संभ्रम असल्याचं चित्र दिसून आलं होतं. अखेर पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Img 20211105 wa0169

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा एक प्रभाग
राहणार आहे. कोरोनामुळे जनगणना होऊ शकलेली नाही,
त्यामुळे या निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरली
जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने या १० वर्षात लोकसंख्या
वाढल्याने कायद्यात बदल करून महापालिकांची सदस्य संख्या
वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे महापालिकेची
सदस्यसंख्या १६१ वरून १७३ इतकी निश्चीत करण्यात आली
आहे. ही नगरसेवकांची संख्या वाढत असल्याने प्रभागांचा
आकार कमी होऊन प्रभागांची संख्या ४२ वरून ५७ इतकी
होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये