कोथरुड

कोथरुडमध्ये नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

कोथरुड : pune city, Kothrud कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जयाबाई सुतार दवाखान्यात करण्यात आले होते.

या शिबिरात सफाई सेवकांची जनरल तपासणी, ब्लड प्रेशर वजन, रक्त तपासणी, महिलांची मासिक पाळी, धनुर्वात सर्दी खोकला, व अन्य काही आजार असतील त्या आजारावर तपासणी करून इंजेक्शन औषध उपचार करण्यात आले. सदर आरोग्य तपासणी शिबिर “स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन- २०२२” अन्वये राबवण्यात आले.

Img 20211028 wa0192 1

अशाच प्रकारे दर तीन महिन्यांनी सफाई कामगारांचे आरोग्य शिबीर राबवण्याचे सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे यांनी यावेळी दिल्या. तसेच सफाई कामगार हा घाणी मध्ये काम करत असल्यामुळे आमच्या सेवकांना वारंवार आरोग्य तपासणी करण्याची आवश्यकता असल्यामुळे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू व त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊ असे आश्वासन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांनी दिले.

सदर शिबिर वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता वावरे, डॉ. अमित संकपाळ, डॉ. प्रतिभा बोराडे, आरोग्य निरीक्षक सुरज पवार, स्नेहल पडे, जया आखरे, अश्विनी चव्हाण,करिष्मा मस्के इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांनी १८० सफाई कामगारांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना औषध उपचार करून निदान करण्यात आले.

Img 20211129 wa0128

सदर आरोग्य तपासणी शिबिर महापालिका सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आले. तसेच सदर शिबिर आयोजित करण्यात आरोग्य निरीक्षक सचिन लोहकरे, करण कुंभार, वैभव घटकांबळे, रूपाली शेडगे, प्रमोद चव्हाण, संतोष ताटकर, नवनाथ मोकाशी, शिवाजी गायकवाड, गणेश चोंधे, हनुमंत चाकणकर, गणेश साठे, सतीश बनसोडे मोकादम वैजीनाथ गायकवाड, अण्णा ढावरे, अशोक खुडे, संजय कांबळे, अशोक कांबळे, गजानन कांबळे तसेच सर्व कायम व कंत्राटी स्त्री पुरुष सेवक सहभागी झाले. सफाई सेवकांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्यामुळे सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे आभार वैजीनाथ गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये