पुणे शहर

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

पुणे : उदय सामंतांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे.  कात्रज चौकात ठाकरे समर्थनकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर  हल्ला केला आहे. पुण्याच्या कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. यानंतर उदय सामंत कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  पुणे दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे पुण्यातील दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेणार असल्याने उदय सामंत हे देखील दगडुशेठच्या दिशेने जात होते. त्यावेळी  ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Img 20220712 wa0009670795149631251448

उदय सामंतांच्या गाडीचा ताफा त्यांनी बघितला आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. त्यांच्या गाडीवर दगडफेक केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पुण्यातील कात्रज चौकात आदित्य ठाकरे यांची सभा होती. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे देखील जवळच्या शंकर महाराज मठात होते.

Img 20220801 wa0304

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे दोघे एकाच दिवशी  पुणे दौऱ्यावर आहेत. एका शहरात, एकाच दिवशी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना आमने-सामने येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये