महाराष्ट्र

बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवारी घोषित, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांमध्ये होणार जोरदार लढत 

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा उमेदवारीची घोषणा करण्यात आली. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला चार ते पाच जागा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजितदादा गटाकडून एकाच टप्प्यात लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, अशी अपेक्षा होती. परंतु, शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली. बारामती लोकसभेची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

विजय शिवतारे यांनी शनिवारी सकाळीच पत्रकार परिषद घेऊन बंडाची तलवार म्यान केली होती. त्यांनी आपण बारामतीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढाई होणार आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही आज पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00048471904785770913928
Img 20240202 wa00029218339254755901166

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये