महाराष्ट्र

राजयोगच्या गणेशाची स्थापना मंदिरातच होणार

राजयोगच्या गणेशाची स्थापना मंदिरातच होणार

वारजे : वारजे येथील राजयोग सोसायटीतील श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळाने करोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षी श्री गणेशाची स्थापना मंडपात नव्हे तर मंदिरातच करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे संस्थापक माजी नगरसेवक व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी सांगितले.

मंडळाच्याच माध्यमातून सामाजिक व राजकीय कारकिर्दीस सुरूवात झाली. त्यांच्यातूनच सर्व मंडळाचे कार्यकर्ते व इतर सहकारी यांच्या सहकार्याने पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक झालो. त्यानंतर माझी पत्नी नगरसेविका झाल्या. नंतर मी स्वतः पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचा सदस्य व दोनवेळा अध्यक्ष झालो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा माझी पत्नी सौ. दिपाली धुमाळ यांना नगरसेविका म्हणून काम करताना पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी बहुमोलाचं मानाचं पद दिलं. हे सर्व मानाची पदे ही मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामांची पावती असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

आपण आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे या मताशी मी नेहमीच ठाम असतो. यावर्षी मंडळाने निर्णय घेतला आहे प्रशासनाला सहकार्य होईल अशा पद्धतीने उत्सव साजरा करायचा. त्याचबरोबर गणेश चतुर्थीला स्थापनेच्या दिवशी व विसर्जना दिवशी कुठलीही मिरवणूक काढायची नाही.तसेच कसलाही डामडौल ठेवायचा नाही असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनीच यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा. श्री गणेश मुर्ती चे विसर्जन आपआपल्या घरी किंवा मंदिरे किंवा मंडपाच्या जागी करावे सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. असे आवाहन धुमाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये