सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या दर्शनाला परवानगी नाही.- अजित पवार
सार्वजनिक मंडळांच्या गणरायाच्या दर्शनाला परवानगी नाही.- अजित पवार
पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाची साथ नियंत्रणात आली नसल्याने नागरिकांनी गणेशोत्सव घरगुती स्वरूपात साजरा करावा.आणि घरातल्या गणपतीचे विसर्जन घरातच करावे.
कोणत्याही कारणाने गर्दी करू नये. प्रमुख मानाच्या व अन्य गणपती दर्शनासाठी कोणालाही परवानगी देऊ नये यादृष्टीने पोलिसांनी दक्षता घ्यावी.असे आदेश उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
गणेशोत्सवात शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कोरोना पसरू नये. यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या आहेत.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी प्रशासकीय बैठक पार पडली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ विभागीय आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी डॉक्टर रमेश देशमुख जमाबंदी आयुक्त एस चोकलिंगम पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर पोलीस आयुक्त के वेंकटेशम ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते




