महाराष्ट्र

बंडखोर आमदारांविरोधात शिवसेने कडून कारवाई सुरू, बंडखोरांना पत्र

मुंबई : बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेकडून कारवाई सुरू करण्यात आली असून बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रातून बैठकीला उपस्थित राहिला नाहीत, तर थेट कारवाई करणार असल्याचं आमदारांना ठणकावून सांगितलं आहे.

शिवसेनेचे पाटणचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांना दिलेल्या पत्रात नमूद केलंय की, पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आणि राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज म्हणजेच, बुधवार 22 जून, 2022 रोजी, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 5 वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे, याची नोंद घ्यावी.

Img 20220610 wa0330

सदर सूचना आपण महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल, पत्यावर पाठवण्यात आली आहे. त्या व्यतिरीक्त आपण समाज माध्यमं, व्हॉट्स अॅप आणि एसएमएस द्वारेही पाठवण्यात आली आहे. या बैठकीस लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणं दिल्याशिवाय या बैठकीला तुम्हाला गैरहजर रहाता येणार नाही.

सदर बैठकीत आपण उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेनं शिवसेना पक्षाचं सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असं मानलं जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतूदीं नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Img 20220621 wa00078738131563619319629

दरम्यान, सध्या महाराष्ट्रात राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशातच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड पुकारला आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. राज्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील राजकारणावर या बंडाचा थेट परिणाम होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील ठाकरे सरकार पणाला लागलं. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह स्वतंत्र गट बनवणार असल्याचं समजतं. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक आमदारांचा मुक्काम सध्या आसामच्या गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसनमध्ये आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये