कोथरुड

कोथरुडमध्ये शिवसेनेचे महागाई विरोधात आंदोलन.. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी..

कोथरुड : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मात्र केंद्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने आज शिवसेना कोथरुड मतदार संघाच्या वतीने केन्द्र सरकारच्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिव सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला.

कोथरुड मधील किनारा हॉटेल चौकात घेण्यात आलेल्या आंदोलनाला शिवसेना शहर प्रमुख गजाजन थरकुडे. गटनेते पृथ्वीराज सुतार ,माजी नगरसेवक योगेश मोकाटे, शाम देशपांडे, नितिन पवार, नितिन शिंदे, भारत सुतार,श्रीपाद चिकणे, किशोर सोनार, नंदकुमार घाटे,कांता बराटे, योगेश मारणे, शिवाजी गाढवे, बाळासाहेब धनवडे, पुरुषोत्तम विटेकर, महिला आघाडी शहर संघटिका सविता मते, छाया भोसले, शर्मिला शिंदे. कस्तुरी पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांनी चुलीवर स्वयंपाक करत महागाईचा निषेध केला.

पेट्रोल डिझेल व गॅस सिलेंडरचे चे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, त्यामुळं जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत, सर्वच गोष्टीच्या किंमती वाढल्याने सर्वसामन्य जनेतेच्या खिशाला झळ बसत आहे. महागाईमुळे सर्व गोष्टी सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने जनता मेटाकुटीला आली आहे असताना सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन केल्याचे उपस्थित शिवसैनिकांनी सांगितले.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये