कोणी काही म्हणू आय सॅल्यूट मुंबई पोलीस

मुंबई : अभिनेते भारत गणेशपुरे यांचा १ महिन्यापूर्वी चोरी गेलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानताना कोणी काही म्हणू आय सॅल्यूट मुंबई पोलीस असे म्हंटले आहे.
काही दिवसांपूर्वी भारत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरीला गेलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता मोबाईल सापडल्यानंतर आणखी एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की, आज आनंदाची गोष्ट म्हणजे मुंबई पोलिसांनी अथक परिश्रम करून माझा मोबाईल शोधून दिला आहे. त्याबद्दल खरोखर मुंबई पोलिसांचे मनापासून धन्यवाद आणि डीसिपी स्वामी साहेब यांचे मनापासून आभार.
खरं तर मंडळी मला वाटलं माझाच मोबाईल यांनी शोधून दिलेला आहे. आज मी साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा जवळपास ३५० मोबाईल त्यांनी शोधून काढलेले होते. आणि ही प्रक्रिया त्यांची कायम चालू असते. आपल्याला माहीत नसत की पोलीस किती काम करतात. आपण नुसतं प्रत्येक वेळेस नाव ठेवण्यात यशस्वी असतो. पण साहेबांनी सांगितले की बऱ्याच लोकांना त्यांचे मोबाईल शोधून परत दिलेले आहेत. कुणी काही म्हटलं तरी आय सल्यूट मुंबई पोलीस.
या कोरोना च्या काळात पोलिसांवर प्रचंड मोठा ताण आहे. सतत अविरतपणे पोलीस कामात आहेत. सगळ्यांसाठी मुंबई पोलीस उत्कृष्टरित्या काम करत आहे. पोलिसांच्या कार्याला मनापासून सलाम आहे असं भारत गणेशपुरे यांनी म्हटलं आहे.



