महाराष्ट्र

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…”, उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा टीझर जारी

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे. या टीझरची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे टीझर ट्वीट करण्यात आलं आहे. हे ट्वीट करताना म्हटलं आहे, “शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!” हा दसरा मेळावा ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे. उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरील टीझरचं ट्वीट रिट्वीट केलं आणि शिवसैनिकांना “वाजत गाजत, गुलाल उधळत या… पण शिस्तीत या,” असं आवाहन केलं.

शिंदे गटानेही आपल्या दसरा मेळाव्याचे अधिकृत पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, तसेच शिवसेनेचा डरकाळी फोडणारा वाघ या प्रतिमांचा वापर केला आहे. या पोस्टरमध्ये ‘एक नेता एक पक्ष एक विचार एकलव्य एकनाथ,’ असा मजकूर लिहित आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न शिंदे गटाने केला आहे.

Img 20220924 182515 453
Img 20220910 wa0003

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये