श्री सद्गुरू संस्कार निवासी शिबीरातून मुलांना मिळाली संस्कारक्षम जीवन जगण्याची शिदोरी…
मुळशीत श्री सद्गुरु संस्कार निवासी २०२३ उत्साहात संपन्न
पुणे : भावी पिढी सुसंस्कृत आणि जबाबदार घडावी यासाठी सालाबादप्रमाणे मुलांसाठी उन्हाळी सुट्टीत आयोजित केले जाणारे श्री सद्गुरु संस्कार निवासी शिबीर या ही वर्षी उत्साहात पार पडले. विविध खेळ व मार्गदर्शनपर कार्यक्रमातून संस्कारक्षम गोष्टी मुलांना या शिबिरात शिकायला मिळाल्या.
नानेगाव मुळशी पुणे येथे श्री सद्गुरु सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष, मृदंग अलंकार ह.भ.प.गणेश महाराज शेडगे आणि गुरूवर्य ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये- साधू-संत आणि शूरवीरांची जीवन चरित्रे, नामजप, मंत्रजप, संगीतमय हरिपाठ आणि विविध पद्धतीने खेळली जाणारी वारकरी पाऊले, खेळ घेण्यात आले.
या आठ दिवसीय शिबिरात सर्व श्री. ह.भ.प. राजेंद्र महाराज दहीभाते, श्रीकांत महाराज पातकर, डॉ. दिलीप सातव, ईश्वर महाराज नलावडे, दत्तात्रय तेरडाळे सर, मयुर गुजर सर, जानकीराम आण्णा जगताप, लहुजी जाधव, दत्तात्रय दहिभाते, सिध्दी राऊत. या अशा बऱ्याच मान्यवरांनी शिबिरातील विद्यार्थ्यांना अध्यात्मिक ज्ञान व उपासना, आहाराचे नियोजन, व्यायाम प्रकार अशा विविध विषयांबाबत मार्गदर्शन केले.
संस्कार शिबिराची सांगता समारंभ काल्याची कीर्तन सेवा, ह.भ.प.श्री. गणेश महाराज कारले यांची झाली. या संस्कार शिबिरास नानेगाव ग्रामस्थ, कर्वेनगर हिंगणे बु.ग्रामस्थ आणि इतर मान्यवर नातेवाईक, मित्र परिवाराचे सहकार्य लाभल्याचे ह.भ.प. श्री गणेश महाराज शेडगे यांनी सांगितले.