पुणे शहर

बसमधून महिलेचे अडीच लाखांचे दागिने चोरीला

पुणे : बसमधील प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला भोसरी येथे राहायला आहे.

ती हडपसरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पीएमपी बसने जात होती. प्रवासादरम्यान चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दोन लाख ६५ हजारांचे दागिने लांबविले. मगरपट्टा थांब्यावर महिला बसमधून उतरली. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचे तिच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार तपास करत आहेत.

Img 20220521 wa0000

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये