पुणे शहर

श्री साई सेवा संस्था शिवणे येथील विशेष मुलांनी साजरा केला प्रजासत्ताक दिन

झेंडे, फुगे, ब्लॅंकेट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

पुणे: श्री साई सेवा संस्था मधील विशेष मुलांनी ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला. शाळेतील ३५ मुलांना ब्लॅंकेट, धान्य  आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. झेंडे, फुगे, चॉकलेट यामुळे शाळेचे वातावरण आनंदमय झाले होते, अशी माहिती “हेल्पिंग हॅण्ड कोथरूड ” आणि “शिवतीर्थ_प्रतिष्ठानचे” गिरीश गुरनानी ,अमोल गायकवाड यांनी पत्रकाद्वारे दिली.

या उपक्रमाचे २० वे वर्ष होते. याप्रसंगी साई सेवा संस्था ट्रस्ट ला १०,००० हजार रुपयाची आर्थिक मदत देखील करण्यात आली तसेच जेवणाची सोय देखील हेलपिंग हॅण्ड कोथरूड आणि शिवतीर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली अशी माहिती गिरीश गुरनानी यांनी दिली.

समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा असतो. या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाते. झेंडा, फुगे, खाऊ मिळाल्यानंतर साई सेवा संस्था येथील मतीमंद मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता. असे गिरीश गुरनानी यांनी सांगितले.

या वेळी राहुल खंदारे,प्रीतम पायगुडे,शेखर तांबे,दिनेश राठी,प्रथमेश नाईक,कमलेश फाले आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये