पुणे शहर

वारजे येथील रामनगरमध्ये पालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम..

वारजे : pune city, warje पुणे महानगरपालिकेच्या वतीने व मानवता सामाजिक सेवा संस्थेच्या प्रयत्नातून सामाजिक कार्यकर्ते स्व. बबनराव बलाढे यांच्या 21 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रामनगर भागातील मजूर नागरीकांसाठी मोफत कोविड लसीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामधे रामनगरसह लगतच्या भागातील नागरीकांनी या विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घेतला.

यावेळी नगरसेवक दिलीप बराटे, माजी नगरसेवक प्रदीप धुमाळ, नगरसेविका सायली वांजळे – शिंदे, राघवदास विद्यालयाचे अध्यक्ष सचिन बराटे, सामाजिक कार्यकर्ते वसंतराव कोळी, शांतता कमिटीचे सदस्य अॅड.राहुल पाटील, आरपीआयचे निलेश आगळे, सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख, मंगेश नवघणे, सागर फाटक, अश्विन ढगे, गौरव दांगट, उषा शिंदे, आदी उपस्थित होते. लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे दिपक बलाढे यांनी केले होते.

Whatsapp image 2021 11 23 at 2. 46. 54 pm

कोरोनाचे संकट अजूनही संपलेले नसल्याने तसेच परीसरामधील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तारडे यांचे सहकार्य लाभले.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये