पुणे शहर

दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन बँकेचा निवडणूक निकाल जाहीर

पुणे : पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को- ऑप. अर्बन बँक लि. पुणे या बँकेची निवडणूकीत माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखालील श्री स्वामी समर्थ पॅनेलने दणदणीत यश मिळवत 13 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. सलग चौथ्यांदा बँकेवर श्री स्वामी समर्थ पॅनेलने निर्विवाद सत्ता मिळवली आहे.

श्री स्वामी समर्थ पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
विठ्ठल नामदेव जगदाळे, बाळकृष्ण दत्तात्रय उंदरे, अजय लक्ष्मण गोळे, शेखर संभाजी सावंत, हनुमंत रघुनाथ खेडेकर, सुनील सदाशिव पोमण, अंकुश लक्ष्मण कदम, राजेंद्र धोंडिबा कोंडे, तनुजा रुपेश रावळ, गजानन उर्फ किरण लक्ष्मण खोंड, रामदास भुजंगराव गायकवाड तर विरोधी पॅनेलच्या सुवर्णा रेणुसे आणि प्रविण नाटके या दोन उमेदवारांचा विजय झाला आहे.

स्वामी समर्थ पॅनेलचे प्रमुख दीपक मानकर म्हणाले,  बँकेच्या सभासदांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ करुन दाखवू. मागील पाच वर्षात आमच्या संचालकांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती या विजयी मतांच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे.  बँकेच्या प्रगतीसाठी आणि बँकेचा अ दर्जा कायम ठेवण्यासाठी नविन संचालक मंडळ प्रयत्नशील राहील असा विश्वास मानकर यांनी व्यक्त केला.

Img 20221121 wa00097959273488039321580
Fb img 1647413711531 1
Img 20221012 192956 045 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये