कोथरुड

पुणे महापालिकेची विकास कामे व मेट्रो वरील खर्च थांबवून पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर खर्च करा ; विजय डाकले यांची अजित पवारांकडे मागणी..

पुणे : पुणे शहरात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरातील आरोग्य यंत्रणा ढासळलेली आहे. महापालिका मात्र अनावश्यक विकास कामांवर खर्च करताना दिसत आहे. त्यामुळे  पुणे महापालिकेची शहरामधील नवीन आर्थिक वर्षातील सर्व विकासकामे आणि मेट्रोवर होणारा खर्च थांबवुन तो सर्व पैसा पुणेकरांच्या आरोग्य सेवेवर आणि आरोग्यसेवेशी सलंग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विजय डाकले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. Stop spending on Pune Municipal Corporation’s development works and Metro and spend on healthcare of Punekars;  Vijay Dakle’s demand to Ajit Pawar

कोरोना महामारीमुळे पुणे शहरामधील आरोग्यसेवा पूर्णापणे कोलमडली आहे. पुण्यात रोज कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. नागरीकांना बेड मिळत नसल्याने उपचार मिळत नसल्याचे चित्र सध्या पुणे शहरात आहे.  राज्य सरकारने कितीही निधी दिला तरी पुण्यातील सत्ताधाऱ्यांचा ढिसाळ नियोजनामुळे पुण्यात कोरोनाच प्रमाण वाढतच असल्याचा आरोप विजय डाकले यांनी केला आहे.

Img 20210223 wa0156

सत्ताधारी भाजपा पुणेकरांना चांगली आरोग्यसेवा देण्याऐवजी आंदोलन, कायदेभंग करत असून त्यांना नागरिकांच्या जीवाची पर्वा नसल्याचे डाकले यांनी म्हंटले आहे. पुणे शहरातील आरोग्यसेवा तातडीने सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे नवीन विकासकामे चालु न करता आवश्यक आणि गरज असतील तीच कामे चालु ठेवावीत. त्यामधील सर्व निधी पुणेकरांच्या आरोग्यसेवेवर आणि त्याच्याशी सलंग्न यंत्रणा उभी करण्यासाठी खर्च करावा व संबंधितांना त्याबाबत आदेश देण्यात यावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये