कोथरूडमधील व्यापारी संघटना आणि भाजप कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र सरकारविरुद्ध रस्त्यावर आंदोलन

पुणे : कोथरूड मधील व्यापारी संघटनांची नुकतीच व्यवस्थित व्यवसायाची घडी बसत असतानाच महाराष्ट्र सरकारने अचानक सर्व दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कोणत्याही छोट्या व्यावसायिकाचा विचार न करता घेतला गेला. अशा या महाराष्ट्र सरकारने चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप करत कोथरुड मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व व्यापारी संघटना रस्त्यावर उतरली.

व्यापारी संघटनेची एकच मागणी आहे आम्ही सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू फक्त आम्हाला आमची दुकाने चालू ठेवायचे परवानगी द्या. कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी या सरकारला आवाहन केले आहे जर हा निर्णय तुम्ही मागे नाही घेतला तर उद्यापासून सर्व नियमांचे पालन करून कोथरूड मधले दुकान आम्ही चालू करू मग भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर महाराष्ट्र सरकारने कितीही गुन्हे नोंदविले तरी त्याला सामोरे जायला आम्ही तयार आहोत.
या आंदोलनाला मतदार संघाचे अध्यक्ष पूनित जोशी ,प्रदीप जोरी, रणजित हगवणे,कोथरूड व्यापारी संघ अध्यक्ष सुनिल गहलोत,उपाध्यक्ष रविराज सारूंग, कोथरूड व्यापारी संघ उपाध्यक्ष बाळसाहेब विचारे, रघुनाथ तापकिर, राजेंद्र चव्हाण व सर्व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



