प्रोजेक्ट माणुसकीतून विद्यार्थ्यांचे हात धावले शेतकऱ्यांच्या मदतीला..

पुणे : आजच्या तरुण पिढी बाबत बरंच काही बोललं जात. त्यांच्या संस्काराबाबत, नवीन तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाबाबत चर्चा होते. पण आजची पिढीही संवेदनशील आहे हे महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांनी सामाजिक जाणिवेतून दाखवून दिले आहे.
मागे काही दिवसापूर्वी आभाळ फाटलं आणि शेतकऱ्यांच्या शेतीच मोठ नुकसान झालं, कुटुंब उध्वस्त झाली. या परिस्थितीत एम आय टी कॉलेज ने आपल्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट माणुसकी उपक्रम दिला यात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला. एम.आय.टी कॉलेज मधील मिशन नेकी ग्रुप च्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात असताना संग्राम मानसी अनिल बिडलान या विद्यार्थ्याने स्वतः शेतकऱ्यांसाठी १०१ किट दिले तर इतर मदतीचे किट जमा करण्यात आले.
मिशन नेकी ग्रुप च्या माध्यमातून एकत्र आलेल्या संग्राम बिडलान, पृथ्वीराज शिंदे, प्रथमेश जगदाळे, राम भोंबे ओमकार वासवा व विद्यार्थ्यांनी हे मदतीचे किट सावळेश्वर, हिंगणी, आष्टे, कुरुळ, घोडकेवस्ती, घुंजेगाव, पीर टाकळी, राम हिंगणी, या गावांमधील गरजू लोकांपर्यंत पोहचवले.

निसर्गानेच आवकृपा केली आणि आभाळ फाटलं, होत्याचं नव्हतं झालं बघितलेल्या परिस्थितीनुसार शेतच्या शेत वाहून गेली, घरं नाहीशी झाली, जो बळीराजा सर्वांना खायला घालत होता त्याच्यावरच आज उपाशी राहायची वेळ आली, अशा वेळेला मनुष्य रूपातूनच देव प्रगट होतो आणि त्याच्याकडून मदत करवतो. हे मदतीचे किट या लोकांपर्यंत पोहचवता आले आणि मला आम्हाला त्यांच्यासाठी काही करता आले याबद्दल मी देवाचा ऋणी आहे अशी भावना एम आय टी चा विद्यार्थी असलेल्या संग्राम बिडलान याने व्यक्त केली.






