पुणे जिल्ह्यात या पर्यटन स्थळांवार जाण्यास करण्यात आला आहे मज्जाव..

पुणे : जिल्ह्यातील गड किल्ल्यांसह सर्व पर्यटन स्थळांकडे जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. गर्दी रोखण्यासाठी आणि कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी हा नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आळंदीमधील संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिरही दोन दिवस बंद राहणार आहे.
बंद करण्यात आलेली पर्यटन स्थळं खालीलप्रमाणे आहेत.
भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम,तुंगार्ली डॅम, राजमाची पॉईंट, मंकी पॉईंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम
वेहेरगाव, टायगर पॉईंट, लायन पॉईंट, शिवलिंग पॉईंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर, पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ, देहूरोड, घोरावडेश्वर डोंगर,कुंडमळा धबधबा

मकर संक्रातीला राज्यातील भाविक आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. या गर्दीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून 13 जानेवारीच्या रात्री 8 वाजल्यापासून 15 जानेवारीच्या सकाळी 6 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. एक परिपत्रक जारी करत आळंदी देवस्थानानं तसं जाहीर केले आहे.






