पुणे शहर

वारजे येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी, खासदार सुळे यांच्या पाठपुराव्याला यश : दुधाने

वारजे :  वारजेसह पुणे परिसरातील पर्यावरण व नदी संवर्धनाच्या दृष्टीकोनातुन गरजेचा असलेला तपोधम येथील  नदीकडेला असणाऱ्या आरक्षीत जागेवरील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असल्याचे राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांनी सांगितले. आता लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे.
   

वारजे येथील आरक्षित जागेवरील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पा च्या कामाचा प्रश्न स्थानिक नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे कोथरुड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने यांचेकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडण्यात आला होता. नदी संवर्धनाच्या दृष्टीने विषय महत्वाचा असल्याने सुळे यांनी यात लक्ष घालत शासनाकडे  पाठपुरावा करत  प्रश्न मार्गी लावला आहे.

स्वप्नील दुधाने यांनी सांगितले की, मौज वारजे तपोधाम सर्व्हे नं.११ मध्ये नदीलगत असणाऱ्या जागेमध्ये पुणे महानगरपालिकेचे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे ( STP ) आरक्षण आहे.  या आरक्षणाची एकुण १२६ गुंठे ( आर ) जागा आहे. १२६ गुठ्यांपैकी ५०% टक्के जागा ही ब्लु लाईन मध्ये बधित होत असल्याकारणाने काम करणे शक्य नव्हते. परंतु पर्यावरणाच्या व नदी संवर्धनाच्या दृष्टिकोनातुन हा प्रकल्प होणे अत्यंत गरजेचे होते. कारण संपुर्ण वारजे व आजुबाजुच्या परिसराचे  मैलापाणी नदीमध्ये शुद्धीकरण न करता जात असल्याकारणाने नदीची प्रदुषणाची पातळी अतिशय गंभीर बनत चालली आहे.  

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

हेच मैलापाणी शुद्धीकरण करुन नदीमध्ये सोडल्यास पर्यावरण व नदीसंवर्धन करण्यास फार मोठी मदत होणार आहे. तसेच मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (STP plant) भौगोलिक दृष्ट्या नदीलगत असणे फार आवश्यक असल्याने पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेली आरक्षणाची जागा योग्य आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिनांक ८ जुन २०२० रोजी जावक क्र.श.अ.जा./ज/११८९ या पत्राने सदर ब्लु लाईन मध्ये STP संदर्भात काम करण्याबाबत मंजुर विकास नियंत्रण नियमावलीत तरतुद करण्यात यावी याबाबत प्रधान सचिव, नगरविकास विभाग मंत्रालय यांना पत्र पाठविले होते.
     

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

खासदार सुळे यांच्यासमोर समोर हा प्रश्न मांडण्यात आल्यानंतर त्यांनी त्वरित महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागाचे प्रधान  सचिव गगराणी  यांच्याशी सविस्तर या विषयी चर्चा केली. सतत दोन महिने राज्यशासनाशी केलेल्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनामार्फत एकात्मिक बांधकाम नियमावली ( UDCPR- 2020 ) करीत असताना त्यामध्ये ब्लु लाईन व रेड लाईन मध्ये sewage Ireatment plant, water/ 995/ Drinage pipe lines चे काम करण्यास समाविष्ट करुन त्यास अंतिम मंजुरी देण्यात आली असल्याचे दुधाने यांनी सांगितले.  

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये