पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे कल दुपारनंतर तर मध्यरात्री निकालाची शक्यता यामुळे होतोय उशीर

मुंबई: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसला आहे. असं असलं तरी या निवडणुकीचे निकाल हाती येणास मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. तर निकालाचा पहिला कल दुपारी 2 नंतर हाती येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती येण्यास संध्याकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतं बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे संध्याकाळी पहिला कल हाती येईल आणि मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास 36 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतमोजणी प्रक्रिया:
सुरवातीला पाचही जिल्ह्यातील मत पत्रिका एकत्र केल्या जाणार
त्यानंतर वैध- अवैध मत वेगळी करणार
नंतर वैध मतांच्या मतपत्रिकेचे गठ्ठे केले जाणार
त्यानंतर पहिल्या पसंतीची मत मोजणी सुरु होणार
पहिल्या फेरीत जर पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून










