कोथरुडपुणे शहर

कोथरूडचा विकास झाला पण मुलांना खेळायला मैदानच नाही : मैदान मिळवण्यासाठी खेळाडूंची अनोखी पत्र मोहीम..

कोथरुड : वेगाने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरुड चा नावलौकिक असला तरी या भागातील मुलांना खेळायला एखादे सार्वजनिक मैदान नसल्याची खंत क्रीडाप्रेमी मंडळी व खेळाडूंकडून व्यक्त केली जात असून मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण द्या अशी मोहीम या मंडळींकडून  सुरू करण्यात आली आहे. मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्या अशी आर्त हाक लोकप्रतिनिधींना पत्राच्या माध्यमातून ही मंडळी करत आहेत.

कोथरूडचा सर्वांगीण विकास होत असला तरी मैदानाशिवाय हा विकास पूर्ण होऊ शकणार नाही. एक ही मोकळे मैदान नसल्यामुळे मुलांना क्रिकेट व इतर मैदानी खेळ खेळता येत नाही. असे खेळ खेळण्यासाठी त्यांना एखाद्या सोसायटीच्या मैदानावर शुल्क भरून खेळावे लागते. काही आरक्षित जागेवर क्रीडा संकुले झाली असली तरी त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या  खाजगी संस्थांकडून घेण्यात येत असलेले शुल्क सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना परवडणारे नाही. त्यामुळे मुलांनी मैदानावर खेळायचेच नाही का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मनसोक्त खेळायला मैदानचं नसेल तर येणारी पिढी सशक्त कशी घडणार? याचा विचार राज्यकर्त्यांनी, प्रशासनाने करायला नको का ? असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होऊ लागला आहे. मुलांना मोफत खेळायला मैदान उपलब्ध करून द्या या आशयाचे पत्र या खेळाडू व क्रीडा प्रेमी मंडळींकडून कोथरुड कर्वेनगर मधील लोकप्रतिनिधींना देण्यात येत असून यासाठी मैदान देण्यासाठी सहकार्याची मागणी करण्यात येत आहे.

Img 20221126 wa02123601048173337149659

लोकप्रतिनिधींना देण्यात येत असलेले पत्र

आम्ही सर्व नागरिक, मतदार, खेळाडू हे कोथरूड विधानसभेचे कायम स्वरूपी रहिवाशी आहोत, खेळाच्या माध्यमातून कोथरूडचे नाव महाराष्ट्रभर मोठे करत आलो आहे. पूर्वी कोथरूड मध्ये मोकळी जागा होती त्याचाच वापर मैदान म्हणून होत होता आज कोथरूड उपनगर विकसित झाले आहे, कोथरूडच्या जलद विकासाची नोंद गिनीजबुक रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे पण ते होत असताना कोथरूड मध्ये एकही मैदान पुणे म. न.पा किंवा महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करण्यात आले नाही का?

येणाऱ्या काळात आपण सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर असता म्हणून तुमच्याकडे आम्ही हा पत्र व्यवहार करत आहोत. कोथरूडचा सर्वांगिण विकास झाला आहे ही होत राहील पण खेळाचे मैदान जोपर्यत होत नाही तोपर्यंत तो पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. येणाऱ्या नविन पिढीला लवकरात लवकर मोकळ्या मैदानात मोफत कसे खेळता येईल, मैदानाची व्यवस्था कशी करता येईल, यासाठी आपण स्वतः ह्यात लक्ष घालावे व मैदानाची व्यवस्था करावी ही तमाम खेळाडु व क्रिकेटप्रेमीं कडुन नम्र विनंती. या आशयाचे पत्र कोथरुड कर्वेनगर मधील राजकीय नेत्यांना दिले जात आहे. आतापर्यंत माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी नगरसेवक दीपक पोटे, शंकर केमसे, राजाभाऊ बराटे, गणेश वरपे, शिवराम मेंगडे या लोकप्रतिनिधींना पत्र देण्यात आली असून ही पत्र देण्याची मोहीम सुरूच आहे.

४०+ पुणे क्रिकेट संघटना, आयडियल स्पोर्ट्स, एस एम व्ही १९९० ग्रुप, साईनाथ क्रिकेट क्लब, मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान,
चम्पियन ट्रॉफी आयोजक, शिवांजली क्रिकेट क्लब, चम्पियन क्रिकेट क्लब (भुसारी कॉलनी), म्हातोबा मित्रमंडळ, दोस्तीग्रुप, न्यू गोल्डन क्रिकेट क्लब, बावधान स्पोर्टस् क्लब यांच्याकडून लढा मैदानासाठी चा सुरू करण्यात आला असून लोकप्रतिनिधींना पत्र देण्यात आल्यानंतर त्याचे पुढे काय होणार, खरच मुलांना खेळायला मैदान मिळणार का हे पाहावे लागणार आहे

Fb img 16474137314577667123777135621121

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये